AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह तंत्रज्ञानावर भर द्या
कृषि वार्ताअॅग्रोवन
शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह तंत्रज्ञानावर भर द्या
शेती क्षेत्राला सक्षम बनविणे आणि शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यायला हवा. तसेच शेतीच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम. एम. वेंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.
श्री. नायडू पुढे म्हणाले, की पीक विविधतेत बदल करणे, मूल्यवर्धित, अन्न प्रक्रिया, चांगली विपणन व्यवस्था, आहारातील बदलत्या सवयी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पीक विविधतेसह फलोत्पादन, रेशीम शेती, कुक्कटपालन, दुग्ध आदी पूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. शेतीच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे. शेतकऱ्यांसोबत काम करून तंत्रज्ञानात वाढ करायला हवी. यामुळे पीक उत्पादकता वाढेल. संदर्भ - अग्रोवन १८-नोव्हे-१७
0
0
इतर लेख