AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खताच्या अनुदानासाठी २३,००० कोटी रुपये मागितले
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
खताच्या अनुदानासाठी २३,००० कोटी रुपये मागितले
खत विभागाच्यावतीने जानेवारी-मार्च या तीन महिन्यातील खत अनुदानाच्या आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी २३,००० कोटी रू. अतिरिक्त मागणी केली आहे. खत विभागाचे वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणाले, की डिसेंबरमध्ये खत कंपन्यांना २३,२८३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आणि मंत्रालयाजवळ आर्थिक वाटप करून १३,०५६ कोटी रु. शिल्लक होते. आता या तीन महिन्याच्या अनुदानाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २३,००० कोटी रु. अतिरिक्त मागणी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पनातून खत कंपन्यांना नियमित आधारवर अनुदान दिले आहे. चालू वित्त वर्षासाठी सरकारने खत अनुदानासाठी ७३,४३९.८५ कोटी रू. वाटप केले होते. जेणेकरून सरकार डिसेंबरपर्यत खत कंपनींना ६०,३८३.७९ करोड रू. दिले आहे. हे खतवर आधारित अनुदान थेट शेतकऱ्यांनापर्यत पोहचत नसून, ते खत कंपन्यांना दिले जात आहे. खत विभागाचे डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (डीबीटी)
योजनाच्या माध्यमातून हे अनुदान दिले जात आहे. जे एलपीजी पर लागू पारंपरिक डीबीटीपेक्षा वेगळे आहे. खत डीबीटी प्रणालीनुसार शेतकरी किवा लाभार्थीना कमी भावात खादय उपलब्ध केले जाणार आहे व किरकोळ विक्रेतांच्या माध्यमातून झालेल्या वास्तविक विक्रीच्या आधारावर लाभार्थींच्या एेवजी कंपनीना अनुदान दिले जात आहे. लाभार्थींची ओळख आधार कार्ड, किसान क्रेडिट कार्ड व मतदान ओळखपत्राच्या माध्यमातून केली जात आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ जानेवारी २०१९
2
0