पशुपालनअॅग्रोवन
गाभण काळातील खाद्य व्यवस्थापन
• गाभण काळामध्ये जर आहाराची काळजी नाही घेतली तर बरेचसे आजार उद्भवतात जसे ताप येणे, दुग्धज्वर, कितनबाधा इ. असे अाजार होऊ नये म्हणून जनावरांना उत्तम संतुलित आहार देणे गरजेचे असते.
• जनावरांना गाभण काळात पचनास हलका चारा द्यावा
• विण्यापूर्वी किमान दीड ते दोन किलो संतुलित पशुखाद्य दररोज द्यावे.
• जनावरांना शारीरिक प्रक्रियेसाठी जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा चांगल्या प्रतीचा चारा दिल्यास मिळते. शरीरस्वास्थ्य चांगले राहाते.
• जनावरांच्या आहारात गरजेनुसार हिरवा चारा, वाळलेला चारा व इतर आवश्यक घटक वापरावे जसे की विकर, प्रोबायोटिक्स, क्षारमिश्रण, प्रतिजैविक इ.
• विकारांच्या वापरामुळे खाद्य जास्त प्रमाणात पचन होऊन जास्त ऊर्जा मिळते.
• प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास उपयुक्त सूक्ष्मजिवांची संख्या वाढून चयापचय क्रिया जलद होते व शरीराला जास्त ऊर्जा मिळते.
• क्षार मिश्रण जनावरांच्या खाद्यामध्ये वापरल्यास आवश्यक असणारे क्षार शरीराला मिळून आजार कमी होतात.
• वरील खाद्य मिश्रणाचा वापर केल्यामुळे गर्भाशयातील वासराची वाढ चांगली होते.
• स्वच्छ अाणि स्वच्छ पाणी जनावरांना पिण्यासाठी नियमितपणे उपलब्ध करून द्यावे.
• कॅल्शिअम, स्फुरदाचे शरीरात पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी गाय/ म्हैस विण्याअगोदर एक ते दोन आठवडे जीवनसत्त्व अ, ड-३ आणि ई युक्त इंजेक्शन द्यावे.
गाभण काळातील व्यवस्थापनाचे महत्त्व
• कासेचे आरोग्य चांगले राहते व दूध उत्पादन मुबलक मिळते.
• दूध तयार करणाऱ्या पेशींना चालना मिळते, संख्या वाढते.
• रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
• विल्यानंतरचे आजाराचे प्रमाण कमी होते.
• जनावरांची प्रकृतीही चांगली राहते.
संदर्भ –अॅग्रोवन