AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी कंपन्यांना ‘ई-नाम’शी जोडणार
कृषि वार्ताअॅग्रोवन
शेतकरी कंपन्यांना ‘ई-नाम’शी जोडणार
नवी दिल्ली: केंद्र शासनाने शेतीमाल बाजार संघटित कऱण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘ई-नाम’ प्रणाली सुरू केली आहे. आता देशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. यादृष्टीने शासन काम करीत आहे, अशी माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या देशात ३ हजार ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ राज्यातील जवळपास १ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या ई - नामशी जोडल्या आहेत. लवकरच आणखी कंपन्या
जोडण्यात येतील. या प्रणालीतून शेतकऱ्यांना बाजार समित्यांत न जाता आपला माल विकता येणार आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल माल जागेवरून विकता येईल. शेतकरी उत्पादक कंपन्या या बाजारात स्वायत्त बाजाराप्रमाणे काम करतील. यामध्ये गोदामांचदेखील समावेश ई-नाम मध्ये करण्यात आला आहे. _x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ५ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
163
1