AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी स्वत: करू शकणार रजिस्ट्रेशन
कृषि वार्तादैनिक भास्कर
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी स्वत: करू शकणार रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी केंद्र शासनाने पीएम-किसान पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर शेतकरी स्वत: ही रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याचबरोबर मिळणाऱ्या अनुदानची पडताळणीदेखील करू शकतात. कृषी मंत्रालयचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगतले की, “आम्ही तीन टप्प्यांमध्ये काम करत आहोत. पहिला टप्पा शेतकऱ्यांना पोर्टलवर स्वत: रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी दयायची आहे. दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना पोर्टलवर आपल्या आधार कार्डची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक पडल्यास नावामध्येदेखील बदल करू शकतात. तिसऱ्या टप्प्यात अनुधान मिळाले आहे की नाही याची पडताळणी करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.” अग्रवाल यांनी सांगतिले की, “शासन आतापर्यंत ६.५५ लाख शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त हप्ता पाठविण्यात आला आहे. यावर २४ हजार करोड रूपये खर्च आला आहे. केंद्र शासनाने अंतिम अर्थसंकल्पात पीएम-किसान योजनेची घोषणा केली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये ६ हजार रू. आर्थिक मदत केली जाईल. ही रक्कम २००० रू. नुसार तीन समान हप्यामध्ये दिली जाईल.” संदर्भ – दैनिक भास्कर, २१ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
366
0