AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरड्या आणि उष्ण हवामानाची संभावना
हवामानाची माहितीडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
कोरड्या आणि उष्ण हवामानाची संभावना
उत्तर भागातील भोपाळ भागावर केवळ १००२ हेप्टा पास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तर काश्मीर खोऱ्यात १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच महाराष्ट्रावर १००६ इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा कि
तापमान वाढले कि हवेचे दाब कमी होतात.त्यामुळे या आठवड्याचे सुरवातीच्या काळात उचांकी तापमान नोंदले जाने शक्य असून उष्ण लहरी म्हणजेच उष्णतेच्या लाटा अनुभवास येतील तापमान वाढले जाईल. ते महाराष्ट्रापासून ते मध्यभारत,गुजरात,राजस्थान मध्यप्रदेश ,उत्तरप्रदेश या प्रदेशात अधिकतम तापमान नोंदले जाईल. साहजिकच हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते या नियमाने वारे दक्षिणेकडून नैऋत्यकडून उत्तर भारताच्या दिशेने वाहतील.त्याच वेळी राजस्थानचे वाळवंट तापेल आणि वारे संपूर्ण भारतावर उष्णतेच्या लाटा निर्माण करतील. डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
51
0
इतर लेख