खादयतेल आयात शुल्कात कपात करू नये
कृषि वार्ताअॅग्रोवन
खादयतेल आयात शुल्कात कपात करू नये
नवी दिल्ली – आग्नेय आशियातील देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारानुसार १ जानेवारीपासून रिफाइंड पामतेल आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून ४५ टक्के व कच्च्या पाम तेलावरील शुल्क ४० टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात येणार आहे. मात्र केंद्र शासनाने भाववाढ कमी करण्यासाठी खादयतेलावरील आयात शुल्क कमी करू नये. शुल्कापासून मिळणारा जास्तीचा निधी हा तेलबिया विकास फंडासाठी वापरावा, अशी मागणी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने शासनाकडे केली आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा पामतेल आयातदार देश आहे. भारतात दरवर्षी ९० लाख टन खादयतेल आयातीपैकी तब्बल ६२ टक्के पामतेल आयात होती. देशातील एकूण खादयतेल आयातीपैकी आयात ही ७ हजार कोटी रूपयांची होते. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २५ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0
इतर लेख