AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पर्यावरणातील पिकांचे कीटक व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पर्यावरणातील पिकांचे कीटक व्यवस्थापन
अनावश्यक कीटकनाशके फवारणीमुळे नैसर्गिक शत्रूंवर प्रतिकूल परिणाम होतो. एकाच वेळी, रासायनिक अवशेष घटक पिकांवरच राहतात याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र यातील शत्रूकीटक व परभक्षी यांचा पिकाला काय फायदा होतो ते जाणून घेउयात.
• लेडीबर्ड बीटल - प्रौढ (भिन्न ठिपके असणे) कीड आणि अळी ही पिकावरील मावा खात असल्यामुळे पिकांचे होणारे नुकसान कमी होते तसेच मावाची लोकसंख्या ही कमी करतात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • क्रायसोपर्ला – हे परभक्षी मऊ शरीर असणाऱ्या रस शोषक किडी खातात. उदा. मावा ,फुलकीड, सफेद माशी, तुडतुडे, पाने खाणारी अळी, इत्यादी _x005F_x000D_ _x005F_x000D_ • सिरफिड फ्लाय – ही परभक्षी विविध प्रकारचे लहान रसशोषक कीटक देखील खातो._x005F_x000D_ _x005F_x000D_ • ड्रॅगन फ्लाय- हे निरंतर उडणारे आणि सक्रिय प्रौढ लहान कीटक आहेत. हे उडणाऱ्या पंतगसोबतच फुलपाखरेदेखील खातात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • जीवोकोरिस - हे कीटक सर्व प्रकारचे लहान रसशोषक कीटक तसेच पाने खाणाऱ्या अळींची अंडी खातात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • रेडुविड बग्स - हे कीटक पिकांमधील रसशोषक कीटक खातात आणि पाने खाणारी अळीचा नाश करतात._x005F_x000D_ _x005F_x000D_ _x005F_x000D_ • टायगर बिटल – हे बिटल पिकांचे नुकसान करणाऱ्या हुमणीच्या अळी खातात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • पेन्टामिमोड बग्स – प्रौढ बग्स पिकांमधील रसशोषक किडींना खातात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • प्रेयिंग मॅंटीड – हे शत्रू कीटक लहान व मोठे कीटक सर्व किडींची संख्या कमी करते._x005F_x000D_ _x005F_x000D_ • स्पायडर- हे कीटक पिकांना नुकसान पोहोविणाऱ्या सर्व किडींची संख्या कमी करतात._x005F_x000D_ _x005F_x000D_ • परभक्षी पक्षी – ब्लॅक ड्रॅगनो, कबुतर सारखे पक्षी पिकांना हानी पोहचविणाऱ्या कीटक तसेच मातीमधील कीटकांना खातात._x005F_x000D_ _x005F_x000D_ पर्यावरणात अजून काही परभक्षी आहेत त्यांचे ही संवर्धन करा _x005F_x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
323
0
इतर लेख