AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उत्पादन कमी असल्याने डाळींचे दर वाढण्याची शक्यता
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
उत्पादन कमी असल्याने डाळींचे दर वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली, यावर्षी डाळींचे कमी उत्पादन कमी असल्याने किमतीमध्ये वाढ होऊ शकते. यावर उपाय म्हणून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला डाळींच्या आयात करण्याच्या प्रमाणात निर्बंध हटवून आयात वाढविण्याचा सल्ला दिला आहे. अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गतील गरजा भागवण्यासाठी डाळी पुरेशा आहेत पण कोणत्याही चढउतारांमुळे टंचाई निर्माण होऊ शकते. डाळींचे उत्पादन घसरण्याची शंका असताना आयातीवर बंदी आणल्याने किंमती वाढतील. मध्य प्रदेशसारख्या मोठ्या उत्पादक राज्यात उडदाच्या जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे डाळींचे उभे राहिलेली पिके खराब झाली आहेत. सरकारने यंदा तूरडाळ आयातीसाठी चार लाख टन कोटा निश्चित केला होता, जो १५ नोव्हेंबरला संपेल. उडीद आणि मुगाची आयात तारीख ३१ ऑक्टोबर रोजी संपली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार डाळींच्या किंमतीत वाढ होऊ शकते. डाळींचे किरकोळ दर, विशेषत: तूरडाळ, प्रति किलो १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. संदर्भ:-इकॉनॉमिक टाइम्स, १५ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
61
0