पशुपालनअॅग्रोवन
थायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे दुर्लक्ष नको
गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार करतात. निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संपर्क, गोठ्यातील अस्वच्छता, जनावरांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे रोगांचा प्रसार वाढतो. रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे तपासून पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
थायलेरियोसीस -
• थायलेरिया अन्युलेटा या जंतुमुळे हा आजार होतो. हे जंतू लिंफ ग्रंथीमध्ये वाढतात. ग्रंथीचा आकार वाढून त्या सुजतात. जनावरांना १०४ ते १०६ अंश फॅरनहाईटपर्यंत ताप येतो.
• या आजाराचे जंतू रक्तातील तांबड्या पेशीवर वाढतात. कालांतराने पेशींचा नाश होतो अाणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
• आजाराचे तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र अाणि जुनाट आजार असे तीन प्रकार पडतात.
• अति तीव्र आजारामध्ये रक्तातील तांबड्या पेशी झपाट्याने मरतात. जनावरे १-४ दिवसांत मरण पावतात. औषधोपचाराला प्रतिसाद देत नाहीत.
• तीव्र आजारामध्ये जनावराला ताप येतो. लिंफ ग्रंथी सुजतात. उपचार केल्यास ५० टक्के जनावरे बरी होतात.
• जुनाट आजारामध्ये तापाचे प्रमाण जास्त असते. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास ९० टक्के जनावरे बरी होतात.
बबेसियोसीस -
• बाबेसिया बायजेमिया या जंतुमुळे हा आजार होतो.
• या अाजाराचे जंतू तांबड्या पेशीवर वाढून पेशींचा नाश करतात.
• जनावराला १०५ ते १०७ अंश फॅरनहाइटपर्यंत तीव्र ताप येतो.
• लघवी लाल होते अाणि जनावरे अचानकपणे मरतात.
• जनावराच्या पाठीमागील पायातील ताकद कमी होते. कावीळची लक्षणे दिसून येतात.
• गाभण जनावरे गाभडतात. मेंदूवर आघात होऊन झटके येतात. पशुवैद्यकांकडून वेळीच उपचार करून घेणे अावश्यक असते.
संदर्भ - अग्रोवन