AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी
कृषि वार्तालोकमत
परदेशात बिगर बासमती तांदळाला मागणी
भारतातील बिगर बासमती तांदळाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असून यंदा देशातून तब्बल ८६ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. तसेच बासमती तांदळाची गेल्या वर्षाइतकीच निर्यात झाली असून बिगर बासमती व बासमती मिळून यंदा १२६ लाख टन तांदळाची विक्रमी निर्यात झाली. त्यात इराण व इराक या दोन देशात सर्वाधिक तांदळाची निर्यात झाली.
बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या देशांत तांदळाचे उत्पादन घटले. तसेच निर्यातीवरील निर्बंधामुळे बिगर बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. भारतातून सुमारे ७० देशांमध्ये तांदळाची निर्यात केली जाते. त्यात अमेरिका, आॅस्टेलिया, आफ्रिका, युरोप, रशिया, सौदी अरेबिया, इराण, इराक या देशांचा समावेश आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा निर्यातीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून त्यातून २३ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले आहे. संदर्भ - लोकमत ८ मे १८
13
0