क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअॅग्रोवन
पीकविम्याचे आता मिळणार किमान एक हजार रुपये
पंतप्रधान पीकविमा योजनेअतंर्गत आता शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. ही रक्कम विमा कंपनीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान पीकविमा योजना, तसेच हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे १०, २० रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना विमा कंपनी पाठवित असे. आता, पीकविम्याची किमान भरपाई ही एक हजार रुपये करण्याचे सरकारने ठरविले होते. या निर्णयाला सरकारने मान्यता दिली असून, विम्याच्या परताव्याची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्या रकमेमधील तफावत राज्य शासन संबंधित विमा कंपनीला देणार आहे. नंतर ही रक्कम संबंधित विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे, असे शासनाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले असून, ही नुकसानभरपाई खरीप २०१८ आणि मृग हंगाम २०१८ हा हंगामापासून लागू होणार आहे. संदर्भ – अॅग्रोवन, ४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
175
0
संबंधित लेख