AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशात नारळाच्या किंमतीमध्ये वाढ
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
देशात नारळाच्या किंमतीमध्ये वाढ
देशामध्ये नारळ उत्पादनामध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. यामुळे नारळ व नारळ तेलच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. शासकीय आकडयांनुसार २०१८-१९ मध्ये नारळ उत्पादनात १० टक्क्यांची घट होऊन चार वर्षातील सर्वात कमी उत्पादन झाले आहे. जगात सर्वात जास्त नारळचे उत्पादन भारतात होते.
या चार वर्षातील नारळच्या कमी उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत नारळच्या किंमतीत दुप्पट होऊन ४० रू. प्रति किलोवर पोहचले आहे. त्याचबरोबर नारळच्या तेलच्या किंमतीमध्ये ही वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयच्या तिसऱ्या अनुमानानुसार २०१८-१९ मध्ये नारळच्या उत्पादनात घट होऊन २१३.८४ करोड युनिटवर आले आहे, जे की २०१७ -१९ मध्ये नारळचे उत्पादन २३७.९८ करोड युनिट होते. एक युनिट म्हणजे नारळचे एक पीस आहे. नारळ उत्पादनामधील घट होण्याचे सर्वात महत्वाचे कारण हवामान आहे. उत्पादन असलेल्या भागात खास करून केरळमध्ये हवामानामुळे बदल झालेले पाहायला मिळत आहे. देशातील एकूण नारळ उत्पादनमध्ये केरळ, तामिळनाडू व कर्नाटक या राज्याचा ८५ टक्के हिस्सा आहे. कर्नाटकमध्ये पावसाच्या कमीमुळे किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे नारळचे उत्पादनामध्ये ३१ टक्क्यांची घट झाली आहे. संदर्भ - इकोनॉमिक टाईम्स, १४ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
123
1