AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जागतिक कापूस उत्पादन २७६ लाख टन होण्याचा अंदाज
कृषी वार्ताAgrostar
जागतिक कापूस उत्पादन २७६ लाख टन होण्याचा अंदाज
मुंबई: २०१९-२० च्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात सहा टक्क्यांनी वाढ होऊन २७६ लाख टन होईल असा अंदाज ‘आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती’ने वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये जागतिक कापूस उत्पादन, वापर आणि दराविषयी सांगितले आहे. जागतिक कापूस उत्पादकतेत वाढ झाल्याने येणाऱ्या २०१९-२० च्या हंगामात कापूस उत्पादन २७६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कापूस वापर २७३ लाख टन राहणार आहे. या तुलनेत मागील वर्षी २०१८-१९ च्या हंगामात २६० लाख टन उत्पादन झाले होते आणि जागतिक कापूस वापर २६८.७ लाख टन झाला होता.
26
0