AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस निर्यातीवर कोरोना विषाणुचा परिणाम होणार नाही
कृषी वार्ताAgrostar
कापूस निर्यातीवर कोरोना विषाणुचा परिणाम होणार नाही
कापूस लागवड करणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. भारतीय कापूस संघ म्हणजेच सीएआय यांनी नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचा परिणाम झाला असला तरी कापूस उद्योगावर परिणाम होणार नाही. भारतीय कापूस संघाच्या अहवालानुसार, कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाचा परिणाम कापसाच्या निर्यातीवर होणार नाही. भारतीय कापूस संघाच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामात कापसाची एकूण निर्यात सुमारे 42 लाख गाठी होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर कापूस हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो.
46
0
इतर लेख