AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरोना व्हायरसमुळे कापूस, बासमती व सोयाबीनच्या किंमतीत घट
कृषी वार्ताAgrostar
कोरोना व्हायरसमुळे कापूस, बासमती व सोयाबीनच्या किंमतीत घट
नवी दिल्ली: संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान माजवला आहे. चीननंतर आता इराणसह दुसऱ्या देशात पसरलेल्या या व्हायरसमुळे कृषी क्षेत्राला फटका बसताना दिसत आहे. मागील एका महिन्यात तांदूळ, कापूस व सोयाबीनच्या किंमतीत १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून होलसेल मार्केटमध्ये कापूस आणि सूताच्या धाग्यांच्या दरात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. बासमती तांदुळाच्या किंमतीत १० टक्के तर सोयाबीनचे दर ५ टक्क्यांनी गडगडले आहेत. त्याचबरोबर साधारण ६० हजार टन तांदूळ बंदरांवरती पडून आहे._x000D_ याचप्रमाणे सोयाबीनच्या निर्यातीत घसरण आली आहे. मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या किंमती १५ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. भारत दर वर्षाला १५ ते २० लाख टन सोयाबीन मील निर्यात करत असतो. यातील २५ टक्के भाग हा इराण खरेदी करत असतो. परिस्थितीत सुधारणा नाही झाली तर सोयाबीनचे दर ५ टक्क्यांनी खाली येतील. _x000D_ संदर्भ – Agrostar, ४ मार्च २०२० _x000D_ ही महत्वपूर्ण बातमी लाइक करा अन् शेअर करा. _x000D_
576
0
इतर लेख