AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण
गव्हू हे रब्बी हंगामातील महत्वाचे पिक आहे महाराष्ट्रात गहू हे जिरायती व बागायती दोन्ही प्रकारात घेतले जाते देशाच्या सरासरीच्या तुलनेत राज्याची उत्पादकता कमी आहे महाराष्ट्राची उत्पादकता कमी होण्याची बरेच करणे आहे सुधारित वाणांचा वापर न करणे, पाणी व्यवस्थापनाचा अभाव, पिक संरक्षणाचा अभाव इ. करणे आहे गव्हू पिकामध्ये तांबेरा हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो तसेच या रोगाची आढळून येणारी लक्षणे त्याचे प्रकार आणि व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत. तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे महाराष्ट्रामध्ये काळा तांबेरा आणि नारंगी तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
काळा तांबेरा –हा रोग पिक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसून येतो.काळा तांबेराचा प्रादुर्भाव गव्हाचे खोड पानांचा देठ,ओंबी वर दिसून येतो पानावर रोगाची लागण होताच प्रथमदर्शी हरित द्रव्य नष्ट झालेला पांढरे चट्टे दिसून येतात नंतर अनुकूल हवामानात त्या ठिकाणी बुरशीच्या तांबूस रंगाचे युरीडोस्पोर तयार होतात त्यामध्ये असंख्य युरीडो असतात पिकांची वाढ होताना व हवेतील तापमान जसजसे वाढत जाते तसतसे युरीडोस्पोरचे रुपांतर काळ्या रंगाच्या टेल्यूटोस्पोर मध्य होते. तापमान १४ ते २३ अंश सें.ग्रे राहिले आहे तर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. पिकाच्या लहान अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते.निम्यापेक्षा जास्त उत्पादनात घट येते. नारंगी तांबेरा – या रोगाचा प्रादुर्भाव गव्हाची पाने व खोडावरील देठ यावर दिसून येतो. या रोगाची लक्षणे पिकाच्या रोपावस्थेपासून ते पक्वतेपर्यंत दिसून येतात रोगाची लागण झाल्यावर गोल आकाराचे पानावर लहान लहान डाग दिसून येतात.कालांतराने गोलाकार आकाराचे पानावर व देठावर गोल आकाराच्या नारंगी रंगाच्या पुळ्या दिसतात या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या भागावर दिसून येतात कालांतराने त्या दोन्ही भागांवर दिसतात या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे होतो या रोगग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची बुकटी बोटास लागते १५ ते २० अंश सें.ग्रे तापमान या रोगास पोषक आहे. रोग व्यवस्थापन – १)रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये. २)तांबेरा प्रतिबंधक वाणाची पेरणीसाठी निवड करावी . ३)वेळेवर पेरणी करावी पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. ४)तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच मॅन्कोझेब २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात फवारणी करावी.
174
0
इतर लेख