AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळींब मधील सुत्राकृमींचे नियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळींब मधील सुत्राकृमींचे नियंत्रण
भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये डाळिंब लागवडीचे प्रमाण वाढले असून डाळिंबाच्या झाडाचे विविध कीड व रोगांमुळे नुकसान होते. झाडाच्या मर रोगाबरोबर डोळ्यांना न दिसणाऱ्या सूत्रकृमिचा प्रादुर्भाव डाळिंबात जास्त प्रमाणात दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाचे प्रमाण हे वाढू लागले आहे, म्हणून सूत्रकृमींचे नियंत्रण या विषयी आपण माहिती देत आहोत. १) रूट नॉट निमॅटोड - या सूत्रकृमीमुळे डाळिंब पिकास फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सुत्रकृमी मुळाच्या अंतर्भागात राहून मुळातील अन्नद्रव्य शोषून घेतात व पोटातील पाचक रस मुळामध्ये सोडते त्यामुळे वनस्पतीच्या मुळांतील पेशींच्या पेशिभित्तिका विरघळून अनेक ठिकाणी मोठ्या पेशी निर्माण होतात. पेशी वाढून त्याच्या मुळांवर गाठी तयार होतात. व झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते. पाने पिवळी पडून फळे आणि फुले अकाली गळण्याचे प्रमाण वाढते. झाडाचे उत्पादन कमी होऊन झाडे मर या रोगाला बळी पडतात. २) रेनीफॉर्म निमॅटोड - ही सुत्रकृमी महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. या सुत्रकृमी प्रामुख्याने सुईसारख्या सूक्ष्म असतात. त्यांच्या अतिसूक्ष्म अवयवांनी मुळांतील रस शोषतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. मुळांचा रंग तपकिरी होतो आणि उत्पादनात घट येते.
नियंत्रणाचे उपाय - १) कलमे तयार करताना सुत्रकृमीयुक्त माती वापरू नये. २) डाळिंब लागवडीपूर्वी १ ते २ वर्ष जमिनीमध्ये भाजीपाला व कडधान्याची पिके घेतलेली नसावी. ३) डाळिंब लागवडीपूर्वी जमिनीची २ ते ३ वेळा खोल नांगरट करून उन्हाळाभर जमीन तापून द्यावी. ४) डाळिंबाची कलमे लावताना खड्डयामध्ये निंबोळी पेंडचा वापर करावा. ५) डाळिंबामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, काकडी इ. आंतरपिके घेऊ नये. ६) डाळिंब बहार धरते वेळी जमिनीत झाडांच्या मुळांजवळ १ ते १.५ किलो प्रती झाड निंबोळी पेंडचा वापर करावा. ७) सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी जैविक खतांचा वापर करावा. उदा. पॅसिलोमायसिस, ट्रॉयकोडर्मा प्लस,सुडोमोनस यांचा वापर केल्यास सुत्रकृमींवर नियंत्रण करता येते. अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २४ जाने १८
224
1