AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीनमधील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या एक दशकापासून गुजरात आणि महाराष्ट्रात या पिकाची लागवडही वाढली आहे. पाने खाणारी अळी केसाळ अळी यांच्या मुळे वेगवेगळ्या पानांचे व पिकाचे नुकसान होते.लहान अळ्या पानांच्या मधला हिरवा भाग खाऊन उपजीविका करण्याची सवय असते. मोठ्या अळ्या ह्या पानावर उपजीविका करून संपूर्ण रोपांची पाने नष्ट करतात. एकात्मिक व्यवस्थापन: शेताभोवती एरंडेची झाडे लावा. पाने खाणाऱ्या अळी अंडी एरंडीच्या पानावर घालतात ते अंडी गोळा करून नष्ट करावीत. निंबोळी तेल 50 मि.ली प्रती पंप. गरज भासल्यास 10 दिवसांच्या अंतराने हे फवारावे. सायंकाळच्या दरम्यान एसएनपीव्ही (न्यूक्लियर पॉलीहेड्रोसीस व्हायरस) 250 LE 500 लिटर पाण्यात प्रति हेक्टर फवारणी करावी.
बॅसिलस थुरिंजिनिसिस जैविक पावडर 15 ग्राम किंवा बवेरिया बासीनाआ जैविक पाउडर 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी जास्त प्रादुर्भाव असल्यास तर प्रोपेनोफॉस 50 इ.सी. 10 मि.ली. किंवा डायक्लोरोव्हास 76 इ.सी. 7 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळू द्या. पाण्याची कमतरतेच्या कालावधी दरम्यान क्विनॉलफॉस 1.5 dust / हेक्टरी 25 किलो प्रति हेक्टर लागू करा. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
307
0