AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामधील सुरवातीच्या अवस्थेतील किडींचे नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामधील सुरवातीच्या अवस्थेतील किडींचे नियंत्रण!
सध्या काही शेतकरी कापसाची लागवड करीत आहेत तर काही ठिकाणी कापूस पिकाचे अंकुर फुटले आहे. कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळात काही किडींचा प्रादुर्भाव होतो. योग्य काळजी न घेतल्यास रोपे सुकतात. बियाण्यावर वाळवी, मुंग्या तर रोपांवर ऐश भुंगेरा, नागअळी इत्यादींचा समावेश होतो. तर चला सुरुवातीच्या अवस्थेतील मुख्य किडींबाबत जाणून घेऊया. नियंत्रण:- • वाळवी किडीचा सुरुवातीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेहमी चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. • मातीमध्ये हिरवळीचे खत कुजण्यासाठी पुरेसा वेळ द्या. पाऊस पडत नसेल तर कुजण्याच्या प्रक्रियेसाठी पाणी द्यावे. • शेणखत देण्यापूर्वी त्यातील न विघटित होणारे घटक काढून टाकावेत. • ज्या जमिनीमध्ये वाळवी किडीचा प्रादुर्भाव होतो अशा जमिनीत ठिबक सिचन सुविधा उपलब्ध असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी @२ लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात ठिबकद्वारे द्यावे. • जर वाळवी किडीमुळे उगवण झालेली रोपे मरत असल्यास त्या रोपाच्या बाजूने आळे करून क्लोरोपायरीफॉस २० ईसी हे कीटकनाशक @२० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे. • कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक वापरण्याऐवजी सकाळी झाडांपासून भुंगेरे (ऐश व्हीवील) गोळा करून नष्ट करा. • यांचा प्रादुर्भाव आढळून येताच नियंत्रणासाठी, निम तेल किंवा निमार्क ची फवारणी करावी. व अधिक प्रादुर्भाव असल्यास मोनोक्रोटोफॉस @३६ एसएल @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
126
4
इतर लेख