AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमधील सामान्य रोग व प्राथमिक उपचार
पशुपालनपशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, जुनागड
जनावरांमधील सामान्य रोग व प्राथमिक उपचार
जनावरांचे पशु संवर्धन व पशु आहार जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच स्वास्थ्यदेखील महत्वाचे आहे. जर पशुपालकांना याचे ज्ञान असेल, तर जनावरांच्या आजारावर वेळीच निदान होईल. याबाबत पशुपालकांना प्राथमिक उपचारांची माहिती असणे आवश्यक आहे. पोटफुगी – जनावरांमध्ये पोटफुगी हा आजार जास्त हिरवा चार खाल्ल्याने होतो. त्याचबरोबर याचा प्रादुर्भाव पावसाळा व थंडीमध्ये जास्त होतो. या आजारामध्ये जनावरांच्या पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जनावरे अस्वस्थ राहतात. उपाय- •खाद्य तेल ५०० मिली व दुध ५०० मिली एकत्र एकजीव मिसळून जनावरांना पाजावे. •हिंग व ताक एकत्र व्यवस्थित मिसळून जनावराला पाजले, तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. •रॉकेलमध्ये सुती कापड बुडवून त्याचा जनावरांना वास द्यावा. अपचन - काही बाबतीत जनावरांचे व्यवस्थितपणे अन्नपचन होत नाही. जनावराने खाल्लेला चारा हा आतड्यामधून पुढे जात नसल्यामुळे जनावर शेण टाकत नाही. उपाय – •२५० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाणीमध्ये मिसळून लगेच जनावरांना द्यावा. •खाद्य तेल १ लिटर किंवा एरंड तेल ३५० मिली जनावरांना पाजल्यास चांगला परिणाम दिसून येतो. संदर्भ: पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, जुनागड
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
658
0
इतर लेख