पशुपालनपशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, जुनागड
जनावरांमधील सामान्य रोग व प्राथमिक उपचार
जनावरांचे पशु संवर्धन व पशु आहार जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच स्वास्थ्यदेखील महत्वाचे आहे. जर पशुपालकांना याचे ज्ञान असेल, तर जनावरांच्या आजारावर वेळीच निदान होईल. याबाबत पशुपालकांना प्राथमिक उपचारांची माहिती असणे आवश्यक आहे.
पोटफुगी –
जनावरांमध्ये पोटफुगी हा आजार जास्त हिरवा चार खाल्ल्याने होतो. त्याचबरोबर याचा प्रादुर्भाव पावसाळा व थंडीमध्ये जास्त होतो. या आजारामध्ये जनावरांच्या पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जनावरे अस्वस्थ राहतात.
उपाय-
•खाद्य तेल ५०० मिली व दुध ५०० मिली एकत्र एकजीव मिसळून जनावरांना पाजावे.
•हिंग व ताक एकत्र व्यवस्थित मिसळून जनावराला पाजले, तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.
•रॉकेलमध्ये सुती कापड बुडवून त्याचा जनावरांना वास द्यावा.
अपचन -
काही बाबतीत जनावरांचे व्यवस्थितपणे अन्नपचन होत नाही. जनावराने खाल्लेला चारा हा आतड्यामधून पुढे जात नसल्यामुळे जनावर शेण टाकत नाही.
उपाय –
•२५० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाणीमध्ये मिसळून लगेच जनावरांना द्यावा.
•खाद्य तेल १ लिटर किंवा एरंड तेल ३५० मिली जनावरांना पाजल्यास चांगला परिणाम दिसून येतो.
संदर्भ: पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, जुनागड
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!