AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसामधील हुमणी किडींचे रासायनिक नियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसामधील हुमणी किडींचे रासायनिक नियंत्रण
• शेतीमध्ये शेणखत मिसळण्यापूर्वी शेणखतामध्ये दाणेदार कीटकनाशक मिसळून द्यावे. • ऊस लागवडीवेळी सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात फिप्रोनील ०.३ टक्के ८-१० किलो मातीत मिसळून द्यावे. • मोठ्या ऊसामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के २ लि प्रति ४०० लि पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. • हुमणी नियंत्रणासाठी शेतीच्या बांधावरील असलेले कडूनिंब व बाभळीच्या झाडावर क्लोरोपायरीफॉस २० टक्के २-२.५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
• ऊसामध्ये हुमाणीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमिडाक्लोप्रीड ४० टक्के अधिक फिप्रोनील ४० टक्के ८० ग्रॅम प्रति २०० लि पाण्यात मिसळून आळवणी करावी. जैविक नियंत्रण • ऊस लागवडीच्या वेळी मेटारायझिम अॅनिसोपली किंवा बिव्हेरिया बॅसियाना ८ -१० किलो प्रति एकरी शेणखतात मिसळून द्यावे. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेन्स
556
2
इतर लेख