AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘या’ आठवडयात पावसाची शक्यता
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
‘या’ आठवडयात पावसाची शक्यता
महाराष्ट्रात आठवडयाच्या सुरूवातीला कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयात चांगल्या पावसाची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरला राज्यावरील हवेच्या दाबात वाढ होईल. त्यातूनच पावसाचे प्रमाण कमी होईल. ४ नोव्हेंबरला उत्तर भारतावर १०१४ हेप्टापास्कल तर राज्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यावेळी कोकण किनारपट्टीलगतचे वादळ अरबी समुद्रात उत्तरेच्या दिशेने जाईल. त्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होणार नाही. ५ नोव्हेंबरला चक्रीय वादळ अरबी समुद्रातून उत्तरेच्या दिशेने वाहत जाईल. त्याचबरोबर आठवडयाच्या सुरूवातीला काही दिवस पाऊस होईल. हवामान अंशत: ढगाळ राहील.
कृषी सल्ला_x000D_ १. बागायत क्षेत्रात हरभरा व गहूची पेरणी करावी. या पिकात मोहरीचे आंतरपीक घ्यावे. _x000D_ २. पेरणीसाठी २ चाडयाची पाभर वापरावी. एकाच चाडयातून गहू तर दुसऱ्या चाडयातून बी पेरावे._x000D_ ३. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, फळबागेत फेरोमेन ट्रॅप लावावेत. _x000D_ ४. १५ नोव्हेंबरपूर्वी पूर्व हंगामी ऊसाची लागवड पूर्ण करावी. _x000D_ _x000D_ संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
78
0