क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तादैनिक समाचार
शेतकऱ्यांना बाजाराच्या जवळ आणण्यासाठी केंद्राने पावले उचलली!
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच शेतीमाल विक्रीच्या बंधनातून शेतकऱ्यांची मुक्तता करणाऱ्या कृषी उत्पन्न व्यापार आणि विपणन वटहुकूम २०२० वटहुकुमलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर केल्याप्रमाणे केंद्र सरकाने जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. यासोबतच एक देश एक कृषी बाजार या धोरणानुसार कृषीउत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेरही मुक्तपणे शेतीमाल विक्रीची मुभा देणारा वटहुकूम तसेच कृषी उत्पादनाला किमान दराची हमी देणाऱ्या वाटकुकूमावरही केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत योजनेच्या पॅकेजची माहिती देताना या बदलाचे सूतोवाच १५ मेस केले होते.त्यानुसार मंत्रिमंडळ निर्णयानुसार १९५५ पासून चालत आलेल्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केली जाणार असून तेलबिया, खाद्यतेल, कडधान्ये, धान्य, बटाटा तसेच कांदा हे जिन्नस प्रतिबंधात्मक यादीतून हटविले जातील.या उत्पादनावर साठवण मर्यादा लागू राहणार नाही.प्रक्रिया उद्योग, पुरवठा साखळीतील व्यावसायीक तसेच निर्यातदारांनाही साठवण मर्यादेचे बंधन नसेल.केवळ नैर्सर्गिक संकट, युद्धसदृश परिस्थिती आणि महागाई यासारख्या अपवादात्मक परिस्थितीतच सरकार हस्तक्षेप करेल.अध्यदेशाद्वारे ही कायदादुरुस्ती लागू केली जाईल. संदर्भ - दैनिक समाचार ४ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
294
0
संबंधित लेख