AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुलै महिन्यासाठी साखरेचा २०.५० लाख टन कोटा
कृषि वार्तापुढारी
जुलै महिन्यासाठी साखरेचा २०.५० लाख टन कोटा
केंद्र सरकारने जुलै महिन्याच्या मागणीच्या तुलनेत २० लाख ५० हजार टन इतका मुबलक कोटा जाहीर केला. केंद्राने साखरेचा प्रतिव्किंटल भाव ३१०० रूपये निर्धारित केला. त्यापेक्षा कमी भावात साखरेची विक्री कारखान्यांना करता येत नाही. त्यामुळे साखरेचे भाव मंदीतच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आला. जुलै महिना तसा पावसाळयाचा राहतो. त्यामुळे साखरेला मागणी कमीच असते. बाजारपेठेच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यासाठी १८ लाख ५० हजार टन इतक्या कमी कोटयाची अपेक्षा होती; मात्र त्यापेक्षा दोन लाख टनने कोटा अधिक देण्यात आला आहे. त्यामुळे साखरेचे भाव मंदीत राहण्याचा अंदाज असून, उलाढालही मंदावण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. संदर्भ – पुढारी, २९ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0