AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ऊसाला २,७५० रू. एफआरपी
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
ऊसाला २,७५० रू. एफआरपी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने एफआरपीचा दर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे. त्यानुसार ऊसाला आगामी गळीत हंगामात १० टक्के रिकव्हरीसाठी पूर्वीप्रमाणे २,७५० रूपये प्रतिटन इतका एफआरपी दर निश्चित करण्यात आला आहे. रिकव्हरीच्या त्यापुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रूपये असा दर जाहीर करण्यात आला आहे, याशिवाय साखरेच्या बफर स्टॉकमध्ये १० लाख टनांनी वाढ केली असून, ती आता ४० लाख टन होणार आहे. माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. आगामी एक वर्षाच्या काळात ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२० या कालीवधीकरिता ४० लाख टन इतक्या साखरेचा बफर स्टॉक केला जाणार असून, बफर स्टॉक अंतर्गत येणाऱ्या साखरेची किंमत १,६७४ कोटी रूपये इतकी असणार आहे. बाजारातील साखरेचे दर व उपलब्धता याच्या आधारे बफर स्टॉकचे प्रमाण वाढवायचे की कमी करायचे, याचा निर्णय सरकार घेत असते. गतवर्षी सरकारने ३० लाख टन इतका बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला होता. सध्याची साखरेची उपलब्धता व दर विचार करून बफर स्टॉकचे प्रमाण १० लाख टनाने वाढवून ते ४० लाख करण्यात आले आहे. याचा फायदा कारखान्यांना होणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. संदर्भ – २४ जुलै २०१९, आउटलुक अॅग्रीकल्चर
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0
इतर लेख