AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र सरकार देणार सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान
कृषी वार्ताAgrostar
केंद्र सरकार देणार सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान
नवी दिल्ली: केंद्र शासन सोयाबीन पेंड निर्यातीवर १५ टक्के अनुदान देणार त्याचबरोबर सोयाबीनवर असणारी ५ टक्के जी एस टी कमी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना, कर्नाटक, आंध्रप्रदेश या सोयाबीन उत्पादक राज्यांना याचा फायदा होणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. सोयाबीन उत्पादनात होणारी वाढ लक्षात घेता भारतीय सोयाबीन पेंडीला जागतिक बाजार पेठेत पोहचवून शेतकऱ्याला उचित दर मिळवून देण्यासाठी राज्य कृषी मुल्य आयोगाने केंद्राकडे १५ टक्के निर्यात अनुदानाची मागणी केली आहे. गेल्या वर्षी हे अनुदान ३ टक्क्यांवरून १० टक्के झाले होते. हा विचार करता, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सोयाबीन पेंडीवरील निर्यात अनुदान ७ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांना केली. त्यांनी या मागणीस सकारात्मकता दर्शविली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडूनही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याचे पटेल यांनी सांगितले. संदर्भ – Agrostar, २४ जून २०१९
26
0
इतर लेख