क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताकृषी जागरण
सोलर पंप अनुदानसाठी नवीन योजना
नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कमी किंमतीत सोलर पॅनल आणि पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजनेची तयारी करत आहेत. या अंतर्गत केंद्र व राज्य सरकार हे दोघे ही एकूण ३०-३० टक्के योगदान देणार आहेत, तर ४० टक्के खर्च शेतकऱ्यांना स्वत: करावा लागणार असल्याची माहिती नवीकरणीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी राज्यसभेमध्ये दिली. सिंह म्हणाले की, केंद्र व राज्य शासन यांनी या योजने अंतर्गत देशभरात २७.५ लाख शेतकऱ्यांना सोलर पॅनल आणि पंप देण्याची तयारी केली आहे. नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या एका अधिकारीनुसार, १ हॉर्स पॉवर सोलर पंप लावण्याचा खर्च ९० हजार रूपये इतका येतो. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये १ हॉर्स पॉवरचा सोलर पंप लावण्यासाठी ४० टक्के हिस्सेदारीच्या स्वरूपात ३६ हजार रूपये दयावे लागणार आहे. यासाठी शासन शेतकऱ्यांना टप्प्यानुसार हप्ता देण्याची सुविधादेखील प्राप्त करून देणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, ८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
238
1
संबंधित लेख