जैविक शेतीअॅग्रोवन
स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर व फायदे
जिवाणू संवर्धकाचा वापर: • पावडर - बीजप्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळविल्यानंतर त्याची पेरणी करावी. • विद्राव्य - ३ ते ५ मि.लि प्रतिकिलो बियाणे. याचा वापर बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया आणि ठिबक सिंचनामध्ये करता येतो. • रोपप्रक्रियेसाठी ३ ते ५ मि.लि जिवाणू संवर्धक प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात कांदा, मिरची, टोमॅटोची रोपे १५ मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर लागवड करावी. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपे लवकर जमिनीत रूजतात. त्यांची चांगली वाढ होते. • ठिबकसाठी एक लिटर विद्राव्य स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति २०० लिटर पाण्यात मिसळावे. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना द्यावे.
फायदे: • स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्यामुळे प्रतिहेक्‍टर ३० ते ५० किलो स्फुरद पिकांना उपलब्ध होते. • फळभाज्या, पालेभाज्यांची वाढ होते. फळधरणा वाढते. • उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते. • स्फुरदाबरोबर विविध संप्रेरके उपलब्ध झाल्यामुळे मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी फळांची गुणवत्ता वाढते. • स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्याने शिफारशीप्रमाणे अगोदरच्या पिकाला वापरलेले स्फुरद नंतरच्या पिकाला उपलब्ध होते. जमिनीचे प्रदूषण कमी होते. जमिनीची सुपीकता टिकून रहाते. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
317
2
संबंधित लेख