क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कीटकनाशके वापरताना काळजी घ्या!
• रासायनिक कीटकनाशकांच्या अत्यधिक वापरामुळे तत्काळ आणि दीर्घकालीन समस्या उद्भवतात. त्यावेळी अशा समस्यांचे निराकरण करण्यास आपण असक्षम असतो, म्हणून अगोदरच काळजी घेणे फायद्याचे ठरते. • सरकारकडून वेळोवेळी बंदी घातलेली हानिकारक औषधे/ कीटकनाशके वापरू नका. • पीक संरक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार औषधांचा वापर करा. • कीटकनाशकांचा शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर केल्यास पिकाचे नुकसान होते, किडीची प्रतिकारकशक्ती वाढते परिणामी कीटकनाशकावरील खर्च वाढतो. • समान/एकसारख्या कीटकनाशकाचा वारंवार वापर केल्यास दीर्घकाळापर्यंत किडींच्या त्या औषधा प्रति प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येक फवारणी वेळी वेगवेगळ्या औषधांचा वापर करावा. • केवळ अधिकृत विक्रेते आणि मंजूर एजन्सींकडूनच कीटकनाशके खरेदी करा. • कीटकनाशक खरेदी करताना, विक्रेत्याकडून पक्के बिल घ्या. • कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या / पॅकेट / कॅन यांचा वापरू करू नका त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. • दोन किंवा अधिक रसायने कोणत्याही शिफारशीशिवाय एकत्र मिसळून फवारणी करु नका आणि योग्य पंप व नोझल वापरा. • कीटकनाशके फवारताना संरक्षणात्मक उपकरणे (कपडे) वापरा. • कीटकनाशकांची फवारणी करताना पाण्याचे पुरेसे प्रमाण वापरा जेणेकरून फवारणी योग्य प्रकारे होईल. • शक्यतो दुपारच्या वेळी कीटकनाशकांची फवारणी टाळा. • जैविक नियंत्रण हे रासायनिक नियंत्रणाचे समानार्थक नसून पूरक आहे. • एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) केल्यास शेतीचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचे प्रदूषण रोखते. • चांगल्या नामांकित कंपनीचे कीटकनाशक खरेदी करा, अचूक माहितीसाठी शक्य तितके अ‍ॅग्रोस्टारशी संपर्क साधा.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस., ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
52
8
संबंधित लेख