AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशु क्रेडिट कार्ड योजनाः हमी आणि व्याजाशिवाय येथे मिळेल कर्ज, असा करा अर्ज!
योजना व अनुदानगुड रिटर्न
पशु क्रेडिट कार्ड योजनाः हमी आणि व्याजाशिवाय येथे मिळेल कर्ज, असा करा अर्ज!
• शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) सुरू केले. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कृषी संबंधित उत्पादनांसाठी कर्ज दिले जाते. या कार्डसह कर्ज घेणे खूप सोपे आहे. २०२२ पर्यंत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे काम सातत्याने करीत आहे. • किसान क्रेडिट कार्डला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले आहे. सरकार शेतकर्‍यांना बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाची पाऊल उचलत आहे. उल्लेखनीय आहे की, किसान क्रेडिट कार्डप्रमाणेच सरकारने देखील पाशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेतही शेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदराने कर्ज दिले जात आहे. • पशु क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे ते जाणून घ्या, आपल्याला पशु क्रेडिट कार्डसाठी काही कागदपत्रे आवश्यक असतील व आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता आहे. अर्ज बँकेत जमा करावा लागतो. अर्जामध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असावा. अर्जाची पडताळणी केल्यानंतर, आपले पशु क्रेडिट कार्ड १ महिन्याच्या आत तयार होईल. • पशु क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी अर्जदारांनी कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत नोंदणीसाठी मोबाइल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे. शेतकर्‍याचे बँक खाते असले पाहिजे आणि आधार बँक नंबर आणि मोबाईल नंबर या बँक खात्याशी जोडला जावा.
संदर्भ:- गुड रिटर्न, २२ जुलै २०२०., हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
297
57
इतर लेख