क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखwww.phytojournal.com
कोरफड पिकाचे लागवड तंत्रज्ञान
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर त्वचा जळाली किंवा कापल्यास यावर उपचार म्हणून केला जातो. त्याचबरोबर हे केसांना जेल म्हणून देखील वापरले जाऊ शकते. खोकला, जखम, अल्सर, जठराची सूज, मधुमेह, कर्करोग, डोकेदुखी, संधिवात या रोगांवरदेखील उपचारासाठी वापरले जाते. या वनस्पतीचा बहुउपयोगी म्हणून वापर होतो. कोरफड लागवड 1. माती – कोरफड लागवडीसाठी निचरा होणारी जमीन तसेच वालुकामय कसदार जमिनिची आवश्यकता असते.जमिनीचा सामू हा ८.५ पर्यंत असणे आवश्यक आहे. 2. जमिन मशागत जमिनीची खोलगट नांगरट करून उभ्या आडवी कोळपणी करून सरी वरंबे पाडून शेतीची लागवडीसाठी तयारी करावी. 3. लागवडीची वेळ चांगल्या वाढीसाठी कोरफडची लागवड ही पावसाळ्यात जुलै- ऑगस्ट महिन्यात करावी. त्याचबरोबर थंडीच्या सुरूवातीला नोव्हेंबर –फेब्रुवारीच्या काळात केली जावी. 4. शेणखत प्रथम लागवडीच्या वेळेस पहिल्या वर्षी २० टन प्रति हेक्टरी शेणखत मातीमध्ये मिसळावे. गांडूळखत २.५ टन प्रति हेक्टरी जमिनीमध्ये मिसळावे. 5. अंतर व लागवड कंदाची लागवड ही १५ सेंमी खड्डा खोदून ६० *६० सेंमी इतक्या अंतरावर लागवड करावी. 6. सिंचन कोरफड लागवड ही बागायती व जिरायती दोन्ही क्षेत्रात केली जाऊ शकते.
कोरफडचे सौंदर्यप्रसाधनामधील महत्व • कोलेजनचे प्रमाण वाढल्यामुळे चेहरा तेजदार व तरुण दिसतो. • साबण, शाम्पू, क्रीम हे घटक तयार करण्यासाठी होतो. • जेल चेहऱ्यावरील गडद डाग यांची तीव्रता कमी करते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील मृत उतींना काढून चेहऱ्यावर तारूण्यपण आणते. • त्वचेला निरोगी व चकाकी येते. संदर्भ - www.phytojournal.com जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
490
0
संबंधित लेख