क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताTV9
जन धन खात्याला आधार कार्डला लिंक करून घ्या आपल्याला इतके रूपये मिळतील.
➡️सर्व खातेधारकांचा आधार नंबर ३१ मार्च २०२१ पर्यंत लिंक करून घेण्याच्या सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, ज्या खात्यांमध्ये पॅन नंबर आवश्यक आहे तिथे पॅन नंबर आणि जिथे आधार नंबर महत्त्वाचा आहे तिथे आधार नंबर ३१ मार्च २०२१ पर्यंत लिंक असला पाहिजे. ➡️ इतकंच नाही तर २.३० लाख रुपयांचा फायदा हवा असेल तर प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये वेळीच आपलं खातं उघडा आणि आधारशी लिंक करा असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. मिळणार २.३० लाखांचा विमा ➡️जनधन खात्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये ओव्हरड्राफ्टसह रुपे डेबिट कार्डदेखील उपलब्ध आहे. या डेबिट कार्डावर १ लाख रुपये अपघाती विमा विनामूल्य मिळत आहे. २८.८.२०१८ नंतर उघडण्यात आलेल्या जनधन खात्यावर अपघाती विमा वाढवून आता तो 2 लाख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या कार्डावर ३०,००० रुपयांचा मोफत जीवन विमा कव्हरही मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सुविधा त्याच खातेधारकांना मिळणार ज्यांनी १५.८.२०१४ पासून ३१.१.२०१५ दरम्यान खाते उघडलं आहे. जनधन खातं आधारशी कसे लिंक कराल? ➡️तुम्ही बँकेत जाऊन खातं आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमची पासबुकचा फोटो घ्यावी लागेल. यानंतर एक फॉर्म सबमिट करावा लागेल. एकदा का तुमचं खातं आधारशी लिंक झालं तर यासंबंधी मोबाइलवर SMS मिळेल. यातही जर तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर तुम्हाला मेसेज मिळणार नाही. ➡️या सरकारी योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थेट जनधन खात्यात पाठवली जाते. दरम्यान, १०,००० रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा ही प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध असणार आहे. यातही कुटुंबातील महिलेला प्राधान्य देण्यात आलं आहे.
200
11
संबंधित लेख