हवामान अपडेटस्कायमेट
महाराष्ट्रातील थंडीचे वाढेल; कोरडे व थंड हवामान राहील.
महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील आणि त्यात सोमवारी वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका वाढेल व तो आठवडाभर कायम राहील. जव्हा कमाल व किमान तापमानात घट होते तेव्हाच हवेच्या दाबात वाढ होते या नियमानुसार थंडीचे प्रमाण वाढेल व त्यामुळे थंड व कोरडे हवामान राहील. मात्र याच आठवड्याचे सुरवातीपासून कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहण्यामुळे थंडीचे प्रमाणावर परिणाम होणे शक्य असून थंडीचे प्रमाणात चढ उत्तर होणे शक्य आहे. त्यामुळे काही काळ किमान तापमानावर त्याचा परिणाम होऊन किमान तापमानात वाढ होऊन थंडीच्या प्रमाणावर परिणाम होणे शक्य आहे. कोकणात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून तसेच पश्चिम व मध्यविदर्भातही ती ईशान्येकडून राहण्यामुळे व ईशान्येकडून थंड वारे वाहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहणे शक्य होईल. ईशान्य भागात थंडीचे प्रमाण अधिक राहील व वारे महाराष्ट्राचे दिशेने वाहतील तेव्हा थंडी वाढेल. मात्र महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सामान स्थिती राहणार नाही. दक्षिणेकडील तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्रप्रदेशचा किनारी भाग, केरळ, दक्षिण कर्नाटक या भागात तसेच पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू व काश्मीर तसेच लडाख भागात पावसाची शक्यता असून महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. शेतकरी मित्रांनो, सदरच्या हवामान अंदाजानुसार आपण पिकांचे योग्य नियोजन करावे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
4
इतर लेख