सल्लागार लेखकृषी जागरण
केळी उत्पादकांनो; पनामा (मर रोग) आहे घातक!
रोगाची लक्षणे – या रोगाची सुरूवात लागवडी नंतर चार ते पाच महिन्याने होते. झाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट हिरवे ते फिकट पिवळया रंगाच्या रेषा दिसतात. पानांच्या कडा पिवळ्या पडत-पडत संपूर्ण पान पिवळे होते. खालून वर या क्रमाने झाडावरील सर्व पाने १ -३ आठवडयात पिवळट होतात. जुन्या पानांच्या कडा वाळतात पाने देठाकडील बाजूने हळू–हळू जमिनीच्या दिशेने वाकतात. पाने संपुर्ण वाळतात व गळून पडतात. नविन येणारी पाने चुरगळलेली फिकट रंगाची असतात.रोगग्रस्त झाडाचे खोड जमिनी लगत उभे चिरले जाते. खोडाच्या आतील भागात लालसर किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडतात हे चट्टेनंतर काळपट होतात अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात. बाहेरून अशाक्रमाने चट्टे पडत जाऊन तेथील अन्नद्रव्य वाहक नलिका मरतात. झाड बुटके राहते. अति तीव्र लक्षणात झाड मरून जाते. नियंत्रणाचे उपाय- • खात्रीशीर व रोगमुक्त कंद किंवा ऊती संवर्धित रोपे लावगडीसाठी वापरावीत. • हंगाम संपताना बागेतील सर्व झाडांचे अवषेश गोळा करून पुर्णपणे नष्ट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. • बाग लावणे पुर्वी तागाचे हिरवळीचे पीक घ्यावे. • भात, ऊस, कांदा यांची १– २ वेळा लागवड करून नंतर केळीचे पीक घ्यावे. • लागवडीपुर्वी शेतात प्रति झाडास १० किलो याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत व त्यासोबत ट्रायकोडर्मा हे जैविक नियंत्रक १०० ग्रॅम प्रति झाड वापरावे. • रासायनिक खतांची शिफारस केलेलीच मात्रा वापरावी. अतिरिक्त नत्राचा वापर करू नये, बागेत पाणी साठू देवू नये, पाण्याचा उत्तम निचरा करावा. • लागवडीसाठी प्रादुर्भावग्रस्त बागेतील कंद, मनुवे वापरू नयेत. • बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी. • लागवडीच्यावेळी कंद २ टक्के कार्बेन्डेझिम या बुरषीनाशकाच्या द्रावणांत ३०.४० मिनिटे बुडवून लागवड करावी. • लागवडीनंतर ५,६ व ९ महिन्यांनी २ टक्के कार्बेन्डेझिमची बुंध्याजवळ आळवणी करावी. • केळी बागेस ठिबक सिंचनाव्दारेच योग्य प्रमाणात पाणी द्यावे. • रोगग्रस्त बागेतून पाणी बाहेर जावू देवू नये. • बागेतील मर रोगग्रस्त झाडे निवडून त्यांची दुर अंतरावर विल्हेवाट लावावी. • लागवडीनंतर ३ व ५ महिन्यांनी प्रतिझाड ४० ग्रॅम कार्बोफ्यूरान बुंध्याभोवती टाकून सोंड किडयांचे नियंत्रण करावे. • सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी निमबेसेडिन ०.०३ टक्के प्रवाही १५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात ३० मिनीटे कंद प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे सुडोमोनास फ्लोरोसन्स ०.५ टक्के डब्लू पी (२x१०९ बीजकंण प्रति ग्रॅम) हा जीवाणू २० ग्रॅम +२५०ग्रॅम निंबोळी पेंड पावडर याचे मिश्रण प्रति झाड या प्रमाणात खोडाभोवती बागंडी पध्दतीने लागवडीवेळी द्यावे. त्यानंतर तिसऱ्या व सहाव्या महिन्यात हिच प्रक्रिया पुनःकरावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
0
संबंधित लेख