कृषी वार्ताकृषी जागरण,
या दिवसानंतर सुरू होणार कांदा लिलाव! सणासुदीला कांदा उत्पादकांना मोठा दिलासा.
👉चार दिवसांनंतर कांदा कोंडी आज फुटणार असून कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. 👉कांदा साठवणुकीवर केंद्र सरकारने निर्बंध लावले होते. होलसेल व्यापारी २५ टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना २ टनपेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अघोषित लिलाव बंद ठेवले होते. 👉त्या पाठोपाठ केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी ३ दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळे निर्बंध हटवले नसले तरी, कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. 👉 कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदीनंतर व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर केंद्रीय आदेश ३७७६ अ नुसार २३ ऑक्टोबर रोजी मर्यादा आणली. 👉केंद्र सरकारने कांदा व्यापाऱ्यांवर साठवणुकीवर निर्बंध घातल्याने 4 दिवसांपासून लासळगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत मधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. अखेर मुख्यमंत्री आणि कांदा व्यापारी यांच्यात बेठक होऊन त्यांना लिलाव सुरू करण्यास सांगितल्यावर आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाले. 👉आज जास्तीस जास्त ५९०० तर सरासरी ४७०० रुपये भाव निघाला. यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी गुरुवारी वर्षा निवासस्थानी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी आजपासून कांद्याचा लिलाव सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. कांद्याबाबत कायमस्वरुपी धोरण ठरविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
7
संबंधित लेख