गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापसात गुलाबी बोंड अळीचा 🐛 प्रादुर्भाव दिसतोय?
ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंड अळी अळीच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे इथून पुढे पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. • फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. • सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये ८ ते १० पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. • फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. • ५ टक्के निंबोळी अर्क किंवा झॉडिरेक्टीन ०. ०३ (३००पी.पी.एम) ५० मी.ली. किंवा .१५ टक्के (१५००पी.पी.एम.) २५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवड केलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेल्या बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडकी बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. 👉 क्लोरपायरीफॉस २५ टक्के @२५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% @३० मि.ली. 👉 किंवा डेल्टामेथ्रीन २. ८ टक्के @१० मि.ली. यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव १० टक्क्याच्यावर आहे, अशा ठिकाणी आवशकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉 यामध्ये ट्रायझोफॉस ३५% + डेल्टामेथ्रीन १% @१७ मि.ली. 👉 किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३% + लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६% @५ मिली 👉 किंवा क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% @२० मि.ली. 👉 किंवा इंडोक्झाकार्ब १४.५% + ॲसीटामाप्रिड ७.७% @१० मि.ली. किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
91
37
इतर लेख