सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये योग्य पाणी व्यवस्थापन!
• रोपांच्या लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे आणि त्यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. • पावसाळयात टोमॅटो पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने • तर हिवाळी हंगामात ५ ते ७ दिवसांच्या अंतरानी • व उन्हाळी हंगामात ३ ते ४ दिवसांच्या अंतरानी रोपांना पाणी द्यावे. • भारी काळया जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. • पाणी देताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात. • हलक्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात. • भारी जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात. • पिक फूलावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्वाचे आहे. • फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे, फळे तडकणे या समस्या निर्माण होतात. • पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. • झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते. • पिकाच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. • म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे. • पाणी देण्यास ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची ५० ते ५५ टक्के बचत होऊन उत्पन्नात ४० टक्के वाढ होते. • ठिबक संचामधून पाणी देताना दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून तेवढे पाणी मोजून द्यावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
18
इतर लेख