क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत विना कागदपत्र उघडा स्मॉल खाते!
पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत देशातून ४० कोटी खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यामध्ये १ लाख २९ हजार ९२९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. मोदी सरकारने ही योजना २०१५ मध्ये सुरु केली होती. देशातील सर्व जण बँकिंग क्षेत्राशी जुडले जावे हा उद्देश या योजनेमागे होता. सरकारच्या अनेक योजनांची सब्सिडी या खात्यात येत असते. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी जन-धन खातेधारक महिलांना दरमहा ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत नवी एक सुविधा देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही स्मॉल खाते उघडू शकतात. जर आपल्याकडे कोणत्याच बँकेत खाते नसेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जनधन योजनेशी जोडले जाऊ शकतात. इतकेच नाही तर आपल्याकडे सुरुवातीला जर कमी कागदपत्र असतील तरीही आपण खाते उघडून जन धन योजनेशी जोडले जाऊ शकतात. स्मॉल खात्याचा कालवाधी हा १२ महिन्यांचा असतो यादरम्यान आपल्याला कागदपत्र जमा करावे लागतात. कागदपत्र दिल्यानंतर आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल. स्मॉल खात्याचे काय आहेत फायदे जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या स्मॉल खात्यात तुम्ही वर्षातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करु शकणार नाहीत. म्हणजेच वर्षभरात आपण फक्त १ लाख रुपये शिल्लक या खात्यात ठेवू शकतात. तर ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आपण या खात्यात जमा करु शकत नाहीत. यासह या खात्यातून आपण फक्त १० हजार रुपये काढू शकतो. सरकारकडून येणारी सब्सिडी आणि योजनेचा पैसा हा यात ठेवता येईल किंमा जमा करता येईल. ही रक्कम खात्याच्या मर्यादेत समावेश केला जाणार नाही. जर तुम्हाला स्मॉल खाते हे झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत करायचे असेल तर आपल्याला Know Your Customer म्हणजे केवायसीच्या अंतर्गत कागदपत्र जमा करावे लागतील आणि आपले खाते झिरो बॅलन्स खात्यात रुपांतरीत केले जाईल. या खात्यासाठी दोन सेल्फ अटेस्टेड फोटो द्यावे लागतील. आपल्या जवळील कोणत्याही बँकेत हे खाते उघडू शकतात. संदर्भ - १५ सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
187
9
संबंधित लेख