अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकावरील पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण
भुईमूग पिकामध्ये लहान अळ्या पाने पोखरतात. पुढे त्या जवळपासची पाने एकत्र करून किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र करून गुंडाळी तयार करतात. अशा गुंडाळीत राहून त्या पाने खातात. तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीत पीक जळाल्यासारखे दिसते. या किडीमुळे पीक उत्पादनात २४ ते ९२ %घट होते. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतात अथवा बांधावर बावचीची झाडे असल्यास ती उपटून त्याचा नाश करावा. आर्थिक नुकसान संकेत पातळीवर लॅंबडा सायहॅलोथ्रीन ५ %@ ०.४ ते ०.६ मि.ली किंवा क्विनालफाॅस २०%@ २.८ मि.ली.प्रति लिटर फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
16
3
संबंधित लेख