अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या टोमॅटो पिकात फळ तडकणे समस्या आहे का?
फळ तडकणे ही टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती आहे. फळ पक्वतेच्या अवस्थेत अधिक ऊन, अधिक आर्द्रता, अचानक जास्त पाऊस किंवा जास्त पाणी देणे यामुळे जमिनीतील ओलाव्यात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे फळ तडकते. पिकामध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, आनुवंशिक गुणधर्म इत्यादी कारणांमुळे ही समस्या दिसून येते. उपाय - • प्रतिकारक्षम जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा. • लागवडीसाठी गादीवाफा, ठिबक सिंचन, आच्छादन यांचा अवलंब करावा. • पाणी व्यवस्थापन योग्यप्रकारे करावे. • माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. • तसेच बोरॉन २०% @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे किंवा @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
100
43
संबंधित लेख