क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
आले पिकासाठी सुधारित अवजारे!
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी छोटी अवजारे तयार केली आहेत. या अवजारांच्यामुळे महिलांचे श्रम कमी होतात. कामाची गती वाढते. वेळेवर काम करणे सोपे जाते.  तण काढण्यासाठी नवीन खुरपे- • पिकामध्ये बहुतांश निंदणीची कामे महिला करतात. • पारंपरिक पद्धतीने खुरप्याने तण काढले जाते. या पद्धतीमुळे महिलांना शारीरिक थकवा जाणवतो. श्रम जास्त लागतात. • तण काढणे काहीवेळा अवघड जाते. वेळ जास्त लागतो. • निंदणीचे श्रम कमी करण्यासाठी विद्यापिठाने सुधारित खुरपे विकसित केले आहे. • या खुरप्यामुळे तण काढणे सोपे जाते. वेळ कमी लागतो. शारीरिक कष्ट कमी होतात. पारंपरिक खुरप्यापेक्षा ५ टक्के काम अधिक होते.  रोपांना माती लावण्यासाठी सावडी- • रोपांना माती लावताना पुरुष मंडळी खोरे वापरतात. हे खोरे वजनाने जड असल्यामुळे महिलांना त्यांचा वापर करणे अवघड जाते. महिला रोपांना मातीची भर देण्यासाठी जुन्या पाइपचा तुकडा, जुना पत्रा वापरतात. • मातीची भर देण्यासाठी पाईप तुकडा किंवा पत्रा वापरल्याने महिलांच्या हाताला इजा होते. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने सावडी तयार केली आहे. • सावडीला वरच्या बाजूस लाकडी मूठ आहे. याच्या वापराने महिलांच्या हाताला जखमा होत नाहीत. मातीची भर देण्याची गती (२१ टक्के) वाढते. • माती लावण्याचे श्रम कमी झाल्याने शारीरिक थकवा जाणवत नाही.  कंद स्वच्छतेसाठी हातमोजे- • आले काढणी करताना नांगराचा वापर केला जातो. यामुळे आल्याचे कंद उघडे पडतात. • तयार आल्याचे कंद जमिनीच्या बाहेर आल्यावर महिला हे गड्डे हाताने माती फोडून वेगळे करतात. हे काम महिला हातांच्या बोटांच्या साहाय्याने करतात. यामुळे बोटे आणि कातडीला जखमा होतात. • पारंपरिक पद्धतीमध्ये महिला आल्याच्या गड्याची माती काढताना लोकरीचे मोजे वापरतात. पण हे मोजे एका दिवसात फाटून जातात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने विशिष्ट हातमोजे तयार केले आहेत. • सुधारित हातमोजामुळे बोटांना इजा होत नाही. गड्डा स्वच्छ करण्याच्या कामाची गती वाढते. शारीरिक थकवा कमी होते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
16
संबंधित लेख