क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
आता बटाटा लागवड झाली सोपी; महिंद्राने आणले ‘हे’ आधुनिक यंत्र
• कृषी क्षेत्रात यंत्राचा वापर अधिक होत आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे जलद गतीने पुर्ण होत असतात. बटाट्याची लागवडही जलद गतीने व्हावी यासाठी महिंद्रा कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आणली आहे. • कंपनीने बटाटे लागवडीसाठी एक नवी मशीन बनवली असून बुधवारी मंहिद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने लॉन्च केली आहे. या मशीनचे नाव प्लांटिंगमास्टर पोटॅटो असे ठेवण्यात आले आहे. • या कृषी यंत्राला कंपनीने युरोप मध्ये स्थित असलेली डेवुल सोबत मिळून तयार केली आहे. • ही मशीन भारतीय कृषीच्या परिस्थितीनुसार बनविण्यात आले असून जी अधिक उत्पन्न आणि उच्च गुणवत्तेसाठी मदत करते, असे सांगण्यात आले आहे. • महिंद्रा आणि डेवुल्फने मागील वर्षी पंजाबमधील प्रगतीशील शेतकऱ्यांशी मिळून बटाटे लागवडीची तंत्रावर काम केले होते. • बटाटे उत्पन्नात २० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ नोंदविण्यात आली होती. दरम्यान बटाटे लागवड करण्याची मशीन ही भाडे तत्वावरही उपलब्ध आहे. • या मशीनला खरेदीसाठी एक सहज सोप्या पद्धतीने वित्तपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान प्लांटिगमास्टर मशीनची विक्रीसाठी पंजाबमध्ये उपलब्ध आहे. • तर उत्तर प्रदेशात विक्री आणि भाडोत्री पद्धतीवरही उपलब्ध असेल. गुजरातमध्येही ही मशीन भाडोत्री पद्धतीवर उपलब्ध असेल. संदर्भ - १० सप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा |
20
7
संबंधित लेख