क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रण!
केळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त प्रमाणात आढळतात. सूत्रकृमी अतिसूक्ष्म लांबट धाग्यासारखे, पारदर्शक व रंगहीन असतात. त्यांची लांबी ०.२ ते ०.५ मिमी असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. केळीच्या कंदामध्ये सूत्रकृमीची मादी दररोज ४ ते ६ अंडी घालते, त्यातून छोटे कृमी बाहेर पडतात. हे सूत्रकृमी मुळांच्या टोकांकडून आत घुसून नुकसान करतात. उपाययोजना सूत्रकृमीग्रस्त जमिनीची खोल नांगरट करून २ ते ३ महिने उन्हामध्ये तापू द्यावी. त्यामुळे सूत्रकृमीच्या अवस्था उष्णतेमुळे मरतात. पीक फेरपालट करावी. लागवडीपूर्वी जमिनीमध्ये धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके घ्यावीत. लागवडीपूर्वी कंद चांगल्या प्रकारे तासून नंतर कंद प्रक्रिया करावी. यासाठी निंबोळीवर आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टिन (१५०० पीपीएम) २० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून ३० मिनिटे प्रक्रिया करावी.(केळी संशोधन केंद्राची शिफारस) पाण्याचा योग्य निचरा करावा. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. बागेमध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यास सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो. झेंडूच्या मुळामधून स्रवणारे अल्फा टर्थेनाईल नावाचे रसायन सूत्रकृमीनाशक असते. लागवडीवेळी सुडोमोनास फ्लोरोसन्स (०.५ टक्के डब्लूडब्लू) (२ बाय १०*९ बीजकण प्रति ग्रॅम) २० ग्रॅमअधिक २५० ग्रॅम निंबोळी पेंड पावडर प्रति झाड खोडाभोवती बांगडी पद्धतीने द्यावे. तिसऱ्या व सहाव्या महिन्यात ही प्रक्रिया पुन्हा करावी. (केळी संशोधन केंद्राची शिफारस) प्रादुर्भाव जास्त असल्यास केळीचा खोडवा घेणे टाळावे
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
3
संबंधित लेख