क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
भात पिकातील पाने गुंडाळणारी अळीचे व्यस्थापन!
शेतकरी बंधुनो,भात पिकातील बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची 50,000 अंडी प्रतिहेक्‍टरी पिकामध्ये सोडावीत. प्रत्येक चुडात 1 ते 2 नवीन कीडग्रस्त पाने दिसल्यास प्रतिहेक्‍टरी ऍसिफेट (76 टक्के प्रवाही) 500 ग्रॅम किंवा कारटॅप हायड्रोक्‍लोराईड 500 ग्रॅम किंवा क्‍लोरपायरीफॉस (20 टक्के) 1875 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (25 ईसी) 1000 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
9
संबंधित लेख