क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील शेंगा करपा रोगाचे नियंत्रण!
सततच्या पावसामुळे शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर त्यावर काळे सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो आणि त्याचा बीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी, टेब्यूकोनॅझोल २५.९ इसी @ १.५ मिलि किंवा टेब्यूकोनॅझोल (१० %) + सल्फर (६५ % डब्ल्यूजी) हे संयुक्त बुरशीनाशक @२.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी दहा दिवसांच्या अंतराने करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
39
5
संबंधित लेख