कृषी वार्ताकृषि जागरण
फक्त ३० मिनिटांत ओळखा; गायी - म्हशींची गर्भधारणा!
देशातील असलेला बळीराजा आपले आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पशुपालनचा व्यवसाय करत असतो. दुग्धव्यसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण बऱ्याच वेळेस जनावरांची गर्भ व्यवस्था लवकर लक्षात येत नाही. लवकर लक्षात येत नसल्याने पशुपालक जनावरे गमावत असतो. परंतु पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जनावरांचा गाभणपणा लवकर लक्षात येणार आहे. पशुपालकांची समस्या लक्षात पशुसंवर्धनातील संशोधनकर्त्यांनी एक गर्भधारणा किट तयार केली आहे. या किटच्या माध्यमातून पशुपालक फक्त ३० मिनीटात जनावरे गाभण आहेत किंवा नाहीत याची माहिती जाणून घेऊ शकतील. या किटला प्रेग- डी असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान हिसार मधील (CIRB) केंद्रीय म्हशी संशोधन संस्था (सीआयआरबी) चे संशोधकांनी ही किट विकसीत केली आहे. आपण या लेखा या किटची विशेषता जाणून घेणार आहोत... काय आहे गर्भधारणा किटची विशेषता या किटच्या मदतीने दहा नमुना चाचणी करु शकणार आहोत. या चाचणी मात्र ३० मिनीटात पूर्ण होतील. दरम्यान या संशोधनाकांनी केलेल्या शोधात अजून एक बाब समोर आली आहे, देशातील मुर्रा क्लोन रेड्यांचा सीमन शुक्राणूने त्याच गुणवत्तेचे जनावरे तयार होतील. IIRB चे संचालकाच्या मते, संशोधकांनी दुधाळ जनावरांच्या गर्भ तपासासाठी ही किट तयार केली आहे. काय आहे प्रेग -डी गर्भधारणा किटची किंमत - या किटची किंमत फक्त तीनशे रुपये आहे. या किटच्या मदतीने जनावरांच्या दोन एमएल युरियनच्या चाचणीतून गर्भधारणेची माहिती होणार आहे. दरम्यान अशी किट ही देशात पहिल्यांदा विकसीत करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. याआधी देशातील तीन मुर्रा जातीच्या क्लोन रेड्यांवर संशोधन करण्यात आले आहे. यातील दोन रेडे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था (NDRI) कर्नाळमधील आहे. आणि तिसरा CIRB हिसार मध्ये आहे. या दोन्ही रेड्यांच्या प्रजनन क्षमता इतर रेड्यांसारखी आहे का नाही याचा शोध घेण्यात आला आहे. संदर्भ - ४ संपत २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
181
21
संबंधित लेख