क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
विहिरीसाठी करा या योजनेचा अर्ज; सरकारकडून मिळते अनुदान!
राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये संरक्षित सिंचनाकरिता प्रामुख्याने विहिरींद्वारे पाण्याची उपलब्धता करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवीन पाणी साठवण निर्मिती या उपघटकांचा अंतर्गत विहीर हा घटक वैयक्तिक लाभाच्या हक्कांमध्ये समाविष्ट केलेला आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेचा उद्देश - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पमध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे. संरक्षित सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादन वाढवणे. या योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना, अनुसूचित जाती जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड लाभ देण्यात येईल. विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा. संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही. लाभार्थी निवड करताना प्रस्तावित नवीन विहिरी व पिण्याच्या पाण्याचा सार्वजनिक स्त्रोत यातील अंतर पाचशे मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी. महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत व्यतिरिक्त प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीच्या अंतर दीडशे मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. गावांमधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरींची घनता लागवड योग्य क्षेत्राच्या आठ विहिरी प्रति चौरस किमी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा जी एस डी ए या व्याख्येप्रमाणे आती शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी घेण्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार मनाई आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीसाठवण संरचना यांची निर्मिती या उपघटक आंतर्गत विहिरी या घटकासाठी शंभर टक्के अनुदान खालील प्रमाणे दोन टप्प्यात देण्यात येईल. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावरील खर्च. विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम अनुज्ञेय राहील. या योजनेअंतर्गत नवीन विहिरींसाठी २,५० लाख रुपये अनुदान अनुज्ञेय राहील. संदर्भ - ४ सेप्टेंबर २०२० कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
440
85
संबंधित लेख