क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकामध्ये पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचे फायदे!
रंगीत निळे व पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करून रसशोषक किडींचे नियंत्रण तर होतेच सोबतच किडींच्या प्रादुर्भावाचे प्रमाण देखील तपासात येते. यानुसार शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक कीडनाशकांची फवारणी करता येते. पिवळ्या रंगाच्या सापळ्याकडे मावा, तुडतुडे, पांढरी माशी व हॉपर्स या किडी तर निळ्या रंगाच्या सापळ्याकडे फुलकिडे (थ्रिप्स) व नागअळीचे पतंग आकर्षित होतात यामध्ये या रसशोषक किडींचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. वापराची पद्धत:- • सापळ्यांच्या दोघी पृष्ठभागांवर घट्ट सेंद्रिय गोंद लेपलेला असतो. सुरवातीला दोघी हातांवर घरगुती वापराचे कोणतेही तेल चोळून घ्यावे. यामुळे तळ हाताला सापळे चीटकणार नाहीत. • सर्व प्रथम वरच्या बाजूचे पारदर्शक आवरण काढून टाकल्यावर, चिकट सापळा ओढून काढावा. • प्रत्येक सापळ्याला दोन छिद्र असून, काडी/काठीला किंवा दोरा/सुतळी ने बांधण्यासाठी याचा वापर करावा. योग्य ठिकाण निवडून काठी जमिनीत खोचून सापळा उभा करावा. • सापळ्याची उंची पिकाच्या वर ठेवावी. वाढत्या पिकासोबत सापळ्याची उंची वाढवावी. • विशीष्ट पिवळ्या व निळ्या रंगामुळे किडी सापळ्याकडे आकर्षित होतात. • एकदा सापळ्यावर बसलेली कीड संपल्यावर चिटकून राहते. अन्नग्रहण व प्रजनन थांबते. प्रजनन थांबल्याने किडीची संख्या नियंत्रित होते. • चिकट सापळ्यांचा असा फायदा होत असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी पिकाची लागवड केल्याबरोबर हे सापळे पिकामध्ये बसवावेत.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
19
संबंधित लेख